मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. जसजशी निकालाची तारीख जवळ येत आहे तसतशी सर्रवच राजकीय पक्षांची आणि त्यांच्या उमेवारांची धाकधूक वाढत चालली असल्याचं दिसत आहे. काही राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे. तर काहींमध्ये काहींच्या मनात आपण जिंकणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जाात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सध्या हीच अवस्था पहावयास मिळत आहे. परंतु काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या गोटात उत्साहाचे वातावरण दिसत आहे तर काँग्रेसमध्ये मात्र शंकेचं वातावरण दिसत आहे.
दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगलाच जोर लावला होता. प्रचारात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जातीने लक्ष घातले होते. राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात असलेल्या सर्व मतदारसंघांमध्ये त्यांनी प्रचारसभा घेतल्या. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे.
दरम्यान या निवडणुकीत काँग्रेसमध्ये मात्र संभ्रमावस्था पहावयास मिळत आहे. काँग्रेसचा प्रचार हवा चसा झाला नाही. राज्यात पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सहा सभा घेतल्या, परंतु मुंबईकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमध्येच प्रचारात अडकले होते. तर राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या समोर गुलबर्गा मतदारसंघात भाजपने यंदा आव्हान उभे केल्याने त् आपल्याच मतदारसंघात अडकून पडले होते. त्यामुळे काँग्रेसला कितपत यश मिळेल याबाबत मात्र संभ्रमावसिथा पहावयास मिळत आहे. येत्या 23 तारखेला लोकसभेचा निकाल लागणार असून याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS