लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 8 उमेदवारांची यादी निश्चित !

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 8 उमेदवारांची यादी निश्चित !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये 26 मतदारसंघातील उमेदवारांवर चर्चा करण्यात आली असून बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या प्रस्तावावर नेत्यांनी चर्चा केली. या उमेदवारांची यादी तयार करण्यात आली असून ती दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

संभाव्य उमेदवारांची यादी

दक्षिण मुंबई – मिलींद देवरा

सोलापूर – सुशीलकुमार शिंदे

वर्धा – चारूलत्ता टोंकस

यवतमाळ – माणिकराव ठाकरे

तसेच काही मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवारांची नावं समोर आली असून याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. यामध्ये नागपूर मतदारसंघासाठी विलास मुत्तेमवार किंवा नाना पटोले, चंद्रपूर मतदारसंघासाठी विजय देवतळे किंवा आशिष देशमुख, शिर्डी मतदारसंघासाठी भाऊसाहेब कांबळे आणि नंदुरबार मतदारसंघासाठी के सी पाडावी यांचं नाव पाठवण्यात येणार आहे. ही यादी दिल्लीला पाठवल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी घेणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी कोणाला संधी देणार याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS