प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसमधील बैठकीत काय निघाला तोडगा ?, वाचा सविस्तर !

प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसमधील बैठकीत काय निघाला तोडगा ?, वाचा सविस्तर !

मुंबई – भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी आज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली. परंतु  महाआघाडीबाबत झालेली आजची चर्चा देखील निष्पळ ठरली आहे. जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीतून कोणताच तोडगा निघालेला नाही. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे हे उपस्थित होते.

दरम्यान या बैठकीनंतरही आघाडीबाबत चर्चा पुढे सरकली नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे. तर आंबेडकर आघाडीत सहभागी होतील याबाबत आम्ही आशावादी असल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली असून महाआघाडीत सहभागी होण्याबाबत चर्चा पुढे सरकलेली नसून संघाने देशात समांतर व्यवस्थापन राबवले आहे, त्याऐवजी घटनात्मक व्यवस्थापन असावे अशी आमची मागणी आहे. त्याबाबत काँग्रेसची स्पष्ट भूमिका आम्हाला हवी आहे, ते समजले तर चर्चा पुढे जाईल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याची आमची मानसिकता असून मतांची विभागणी होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. आम्ही आज त्यांच्या घरी चर्चेसाठी गेलो होतो. आतापर्यंत 6 बैठका झाल्या, आता त्यांनी सकारात्मकता दाखवावी असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

COMMENTS