काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अखेर समझोता, दोन्ही पक्ष  लढवणार लोकसभेच्या एवढ्या जागा ?

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अखेर समझोता, दोन्ही पक्ष लढवणार लोकसभेच्या एवढ्या जागा ?

नवी दिल्ली – काँग्रेस- राष्ट्रवादीच्या महाआघाडीमध्ये गेली काही दिवसांपासून जागावाटपावरुन चर्चा सुरु होती. काही केलं जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. परंतु हा तिढा अखेर सुटला असल्याची माहिती आहे.  दोन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी २४ जागा येणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये हा निर्णय झााला असल्याची माहिती आहे.

दरम्यान आपल्या वाट्याला ज्या जागा आल्या आहेत, त्यातून दोन्ही पक्षांनी इतरांना कोणत्या जागा सोडायच्या हे ठरवलं जाणार आहे.यासाठी शरद पवार हे महाराष्ट्रातील रिपब्लिकन पार्टी (आंबेडकर गट), माकप, बहुजन विकास आघाडी, शेकाप, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याशी आघाडीसंदर्भात चर्चा करीत आहेत. परंतु या समझोत्याची अधिकृत  घोषणा अजून बाकी आहे.

दरम्यान काँग्रेसच्या कोअर समितीच्या बैठकीत या समझोत्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.यापूर्वी काँग्रेस स्वत: २६ जागा लढवू इच्छित होती आणि राष्ट्रवादीला २२ जागा देण्याचीच त्या पक्षाची तयारी होती. मात्र काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हे वाद संपवण्यासाठी जागावाटपाचे सर्वाधिकार शरद पवार यांना देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महाआघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS