नारायण राणेंना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची योजना !

नारायण राणेंना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची योजना !

मुंबई – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पाठिंबा देण्याची योजना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची असल्याची माहिती आहे.  त्यामुळे ही जागा जाणीवपूर्वक काँग्रेसकडून राष्ट्रवादीला सोडण्यात येणार आहे. भाजप-शिवसेना युती झाल्यास आपला मार्ग वेगळा असेल, असे नारायण राणे यांनी जाहीर केले होते.

त्याचबरोबर काल झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्यात राणे यांनी आपण स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी राणे यांना पाठिंबा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातील कार्यकर्त्यांचा मेळावा काल मुंबईतील रंगशारदा येथे पार पडला. यावेळी त्यांनी स्वाभिमान स्वबळावर निवडणूक लढवेल अशी घोषणा केली. तसेच आपले पुत्र माजी खासदार निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असेही त्यांनी जाहीर केले आहे.

तसेच आघाडीत आणि युतीत जाणार नसल्याचं नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात राणे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पाठिंबा देणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालं असल्याचं दिसत आहे.

COMMENTS