मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट ओसरली असल्याचं दिसत आहे. कारण दोन दिवसांपूर्वी वर्धा येथे झालेल्या सभेत राज्यातील जनतेनं भाजपकडे पाठ फिरवली असून या सभेदरम्यान अर्ध्या खुर्च्या रिकाम्या असल्याचं पहावयास मिळाले. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला धक्का बसणार असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात मांडला जात आहे.
दरम्यान 2014 च्या निवडणुकीत आणि त्यानंतरही मोदींच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळत होता. मोदींच्या सभेला अलोट गर्दी पहावयास मिळाली. परंतु आता भाजप आणि मोदींची लाट कुठेतरी ओसरत चालली असल्याचं दिसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात येणाय्रा सभेकडे जनतेनं पाठ फिरवल्यामुळे याचा फटका भाजपला आगामी निवडणुकीत बसू शकतो असं बोललं जात आहे.
तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसरी जाहीर सभा गोंदिया येथे पार पडणार आहे. आज पाच वाजता होणाय्रा या सभेत जनता कितपत प्रतिसाद देणार यावरुनही भाजपच्या ताकदीचा अंदाज मांडला जाणार आहे. त्यामुळे या सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS