23 तारखेला राज्यातील ‘या’ मतदारसंघातील निकाल सर्वात आधी लागणार !

23 तारखेला राज्यातील ‘या’ मतदारसंघातील निकाल सर्वात आधी लागणार !

मुंबई – लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 23 तारखेला लागणार आहे. त्यामुळे या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. यावेळी महाराष्ट्रातून गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचा निकाल सर्वात आधी हाती येण्याची शक्यता आहे. साधारणत: दुपारी 1 वाजेपर्यंत या मतदारसंघातील निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच 5 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे याठिकाणचा निकाल सर्वात आधी लागेल अशी शक्यता आहे.

दरम्यान गडचिरोलीपाठोबात साताऱ्यात सर्वाधिक कमी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या जागेवरही 23 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल लागण्याची शक्यता आहे. गडचिरोली आणि साताऱ्यानंतर लातूर, नंदूरबार, रत्नागिरी, पालघर या मतदारसंघांतील चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे 23 तारखेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS