मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. या पहिल्या टप्प्यात सात मतदारसंघांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या मतदानाचा निकाल गुरुवार 23 मे रोजी लागणार आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असून पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, हंसराज अहिर, नाना पटोले यांसारख्या दिग्गज नेत्यांसह 116 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहेत. चार जागांवर भाजप आणि काँग्रेसचा थेट सामना होणार आहे, तर दोन जागांवर काँग्रेस आणि शिवसेना भिडणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत या नेत्यांमध्ये होणार मुख्य लढत
नागपूर – नितीन गडकरी (भाजप) VS नाना पटोले (काँग्रेस)
वर्धा – रामदास तडस (भाजप) VS चारुलता टोकस (काँग्रेस) VS अॅड. धनंजय वंजारी (वंचित बहुजन आघाडी)
चंद्रपूर – हंसराज अहिर (भाजप) VS बाळू धानोरकर (काँग्रेस)
रामटेक – कृपाल तुमाणे (शिवसेना) VS किशोर गजभिये (काँग्रेस)
भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे (भाजप) VS नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)
यवतमाळ-वाशिम – भावना गवळी (शिवसेना) VS माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
गडचिरोली-चिमुर अशोक नेते (भाजप) VS नामदेव उसेंडी (काँग्रेस)
COMMENTS