नागपूर – शेतकरी कर्जमाफीचा गोंधळ काही संपता संपत नाही. अगदी कर्जमाफीची घोषणा झाल्यापासून हा गोंधळ सुरू आहे. आता कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आकडेवारीचा गोंधळ पुढे आला आहे. त्याला कारण ठरलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि सहकार मंत्र्यांनी दिलेली वेगवेगळी आकडेवारी. त्यामुळे खरी आकडेवारी कोणाची मानायची असा प्रश्न पडला आहे.
राज्यातील १५ लाख ४२ हजार शेतकर्यांच्या खात्यावर ६ हजार ५०० कोटी रुपये जमा झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी 24 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबरला केला होता. तसं ट्विट त्यांनी 24 आणि 25 नोव्हेंबरला केलं होतं. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत लेखी उत्तरात मात्र वेगळीच माहिती दिली आहे. ५ डिसेंबरपर्यंत ९ लाख ४३ हजार शेतकर्यांच्या खात्यात ५ हजार १४२ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती सहकार मंत्र्याची विधानसभेतील लेखी उत्तरात दिली आहे.
COMMENTS