आतापर्यंत 15 लाख 42 हजार शेतक-यांना कर्जमाफीचे पैसे दिले, मुख्यमंत्र्यांचा दावा !

आतापर्यंत 15 लाख 42 हजार शेतक-यांना कर्जमाफीचे पैसे दिले, मुख्यमंत्र्यांचा दावा !

कोल्हापूर – राज्यात सगळीकडे कर्जमाफीबाबत सावळा गोंधळ सुरू असताना आणि अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र आतापर्य़ंत 15 लाख 42 हजार शेतक-यांना कर्जमाफीचे पैसे दिल्याचा दावा केला आहे. या शेतक-यांच्या खात्यावर आतापर्य़ंत 6 हजार 500 कोटी रुपये जमा झाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मागच्या कर्जमाफीच्या वेळी अनेकांनी हात धुवून घेतले. त्यामुळे यावेळी आम्ही अत्यंत काळजीपूर्वक काम करत आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले.  कर्जमाफी ही योजना नाही तर मदत आहे. नियमित कर्ज भरणा-यांन आणखी मदत करण्याची इच्छा असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

शालेय पोषण आहारामध्ये दुधाची भुकटी वापरण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहेत.. त्या साठी समिती गठीत केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

COMMENTS