देशाच्या राजकारणात आता प्रभू राम विरुद्ध भगवान श्रीकृष्ण ?

देशाच्या राजकारणात आता प्रभू राम विरुद्ध भगवान श्रीकृष्ण ?

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या एका वक्तव्यामुळे आता देशाच्या राजकारणात नवा वाद समोर येण्याची शक्यात आहे. प्रभू रामचंद्रांना केवळ उत्तर भारतात मानतात, मात्र भगावन श्रीकृष्णाला संपूर्ण देशात मानतात. तसंच श्रीकृष्णाने समाजातील सर्व घटकांना न्याय दिला असंही मुलायमसिंग यादव यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच आता देशाच्या राजकारणात राम विरुद्ध कृष्ण असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशचं राजकारण आता राम आणि श्रीकृष्णाभोवती फिरण्याची शक्यता आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन ध्रुविकरणाचा भाजपाच नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. त्यातच आता योगी आदित्यनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवल्यानंतर त्यांनी आक्रमक हिंदुत्व पुढे रेटण्यास सुरूवात केली आहे. योगी यांनी आयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचा 100 फुटी पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

भाजपचं हे धार्मिक ध्रुविकरणाचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी समाजवादी पार्टीनं आता ही नवी शक्कल पुढं केल्याचं बोललं जातंय. माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश सिंह यांनी सैफईमध्ये भगावन श्रीकृष्ण यांचा 50 फुटी पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सामान परदेशातून आणण्यात आलं आहे. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे काल मुलायम सिंह यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आम्ही यादवांचे वंशज आहोत. आज यादव सगळ्यांना न्याय देतात. त्याच प्रमाणे श्रीकृष्णाने सगळ्यांना न्याय दिला. म्हणून संपूर्ण देशात तचं परदेशातही श्रीकृष्णाला मानतात असंही मुलायमसिंह म्हणाले. त्यामुळे भाजपकडून राम नामाचा तर समाजवादी पार्टीकडून कृष्णाचा जप केला जाणार हे निश्चित आहे.

 

COMMENTS