मुंबई – भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात मुंबईत गुप्त बैठक झाली आहे. प्रभादेवी येथील हॉटेल इंडिया बुल्स स्काय या हॉटेलमध्ये जवळपास तास- दीड तास ही भेट झाली. देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणं जुळताना दिसत आहेत. या भेटीनंतर राज ठाकरे हॉटेलच्या मागच्या गेटने बाहेर पडले. ही भेट अत्यंत गोपनीय होती. जवळपास 1 ते दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली.
दरम्यान एकीकडे शिवसेनेने भाजपची साथ सोडली आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करुन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर आगामी काळात मनसे आणि भाजप एकत्र येतील असा अंदाज गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत होता. तशा चर्चा सुरु होत्या. या भेटीने त्या चर्चांना बळ मिळालं आहे.
COMMENTS