त्यांना काही तारतम्यच नाय, अजितदादांनी फटकारले

त्यांना काही तारतम्यच नाय, अजितदादांनी फटकारले

मुंबई : कर्नाटक राज्यातील बेळगाव-निपाणीसह अनेक गावांमधील मराठी भाषांचे भूभाग महाराष्ट्रात समावेश करावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य सरकाराच आमनेसामने आहे. यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवादी यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद भागात राहणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की, मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा. त्यामुळे जोपर्यंत मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश केला जात नाही, तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावं,” असे म्हटले आहे.

यावर आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना चांगलाच समाचार घेतला. मुंबईत माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असा दावा करणाऱ्या लक्ष्मण सवदी यांना उत्तर दिले. सवदींनी केलेल्या विधानाला काही आधार नाही, काही तारतम्य नाही, अशा शब्दात त्यांनी सवदींना फटकारले.

अजित पवार म्हणाले, “जी गावं वादग्रस्त आहेत ती केंद्रशासित करावीत असं आपले मुख्यमंत्री म्हणाले. त्याला उत्तर देताना कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी तेथील लोकांना खूश करण्यासाठी मुंबई केंद्र शासित करा, असं म्हणाले असतील, असं सांगत त्यांच्या विधानाला कवडीचा आधार नाही”,
“बेळगावचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. महाजन समितीचाही अहवाल आहे. तसंच ज्यावेळी दोन राज्यांच्या सीमांचा वाद असतो त्यावेळी केंद्र सरकारने हस्तक्षेप करायचा असतो … एकतर्फी बोलायचं नसतं किंवा तसे निर्णयही घ्यायचे नसतात”, असं म्हणत अजित पवारांनी केंद्रावर निशाणा साधला.
“सीमा भागातील वादग्रस्त भाग आमचा आहे असा दाखवण्याचा कर्नाटकचा प्रयत्न आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तसंच या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध” असल्याचं अजित पवार म्हणाले.

COMMENTS