मुंबई – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज विरोधी पक्षांनी सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यावेळी विरोधकांनी आगळीवेगळी पोस्टरबाजी केली आहे. यामध्ये ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचे पोस्टर छापण्यात आले असून त्याला
‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र’ असे म्हटले आहे. या पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो छापण्यात आले आहेत. यामध्ये आमीर खानच्या जागी मुख्यमंत्री फडणवीस आणि अमिताभ बच्चन यांच्या जागी उद्धव ठाकरे यांचे चेहरे दाखवले आहेत. ठगबाजीची चार वर्षे असे नाव पोस्टरला देण्यात आले आहे.
भाजप-शिवसेना सरकार 4 वर्षांपासून केवळ ठगबाजी करीत आहे. त्यामुळे या सरकारला आम्ही ‘ठग ऑफ महाराष्ट्र’ची उपमा दिली. पत्रकार परिषदेत त्यांच्या ठगबाजीचा पंचनामा करणारे बॅकड्रॉप उभारले. नुकताच प्रदर्शित झालेला ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ फ्लॉप करणारी जनता या ठगांनाही भूईसपाट करणार हे नक्की. pic.twitter.com/UFaHt7zUgy
— R Vikhe Patil (@RVikhePatil) November 18, 2018
दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची रणनिती ठरविण्यासाठी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी विरोधी पक्षाच्या गटनेत्यांच्या बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान ही पोस्टरबाजी करण्यात आली. यामध्ये जनतेशी ठगबाजी, औद्योगिक ठगबाजी, भावनिक ठगबाजी, शेतकऱ्यांशी ठगबाजी अशी नावे देण्यात आली आहेत.
COMMENTS