विरोधकांची पोस्टरबाजी, आमीर खानच्या जागी फडणवीस तर अमिताभच्या जागी उद्धव ठाकरे !

विरोधकांची पोस्टरबाजी, आमीर खानच्या जागी फडणवीस तर अमिताभच्या जागी उद्धव ठाकरे !

मुंबई – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज विरोधी पक्षांनी सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यावेळी विरोधकांनी आगळीवेगळी पोस्टरबाजी केली आहे. यामध्ये ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचे पोस्टर छापण्यात आले असून त्याला

‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र’ असे म्हटले आहे. या पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो छापण्यात आले आहेत. यामध्ये आमीर खानच्या जागी मुख्यमंत्री फडणवीस आणि अमिताभ बच्चन यांच्या जागी उद्धव ठाकरे यांचे चेहरे दाखवले आहेत. ठगबाजीची चार वर्षे असे नाव पोस्टरला देण्यात आले आहे.

दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची रणनिती ठरविण्यासाठी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी विरोधी पक्षाच्या गटनेत्यांच्या बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान ही पोस्टरबाजी करण्यात आली. यामध्ये जनतेशी ठगबाजी, औद्योगिक ठगबाजी, भावनिक ठगबाजी, शेतकऱ्यांशी ठगबाजी अशी नावे देण्यात आली आहेत.

 

COMMENTS