राज ठाकरेंचे निकटवर्तीय महेश मांजरेकर काँग्रेसमध्ये जाणार ?

राज ठाकरेंचे निकटवर्तीय महेश मांजरेकर काँग्रेसमध्ये जाणार ?

मुंबई   मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. ते आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढवणार असल्याचं बोललं जात आहे. महेश मांजरेकर यांनी 2014 मध्ये उत्तर-पश्चिम मतदारसंघातून मनसेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान 2019 लोकसभा निवडणुकीआधी आता मांजरेकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. महेश मांजरेकर हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे महेश मांजरेकर राज ठाकरे यांची साथ सोडून काँग्रेसचा ‘हात’ धरण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत अशोक चव्हाण यांना संपर्क साधला असता त्यांनी महेश मांजरेकर आले तर त्यांचं पक्षात स्वागतच असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महेश मांजरेकर हे काँग्रेसमध्ये जाणार की नाही हे काही दिवसातच समजणार आहे.

COMMENTS