काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्ष टीका, म्हणे पांढऱ्या दाढीचा सांताक्लॉज लोकांचे पैसे पळवतो !

काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्ष टीका, म्हणे पांढऱ्या दाढीचा सांताक्लॉज लोकांचे पैसे पळवतो !

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेत्यानं जोरदार टीकास्त्र केलं आहे. भारतात पांढ-या दाढीचा सांताक्लॉज असून तो लोकांचे पैसे पळवत असल्याचं ट्विट काँग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी केलं आहे. सध्या संपूर्ण जगात पांढ-या दाढीचा सांताक्लॉज लोकांना पैसे आणि भेटवस्तू देत असतो पंरतु भारतात पांढ-या दाढीचा सांताक्लॉज लोकांचे पैसे पळवत असल्याचं ट्विट तिवारी यांनी केलं आहे. नोटाबंदी आणि जीएसटीला काँग्रेसनं अनेकवेळा विरोध केला आहे. त्यावरुन मनिष तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीक केली असल्याचं दिसत आहे.

दरम्पांयान मनिष तिवारी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये पाढ-या दाढीचा वृद्ध माणूस टीव्हीतून तुमच्या घरात शिरतो. घरात शिरल्यानंतर तो लोकांची पाकिटं, कपाट, लॉकर सर्व ठिकाणचे पैसे काढून घेतो. त्यामुळे तुमच्या अंगावर फक्त मोजेच (सॉक्स) शिल्लक राहतात, असे तिवारी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सध्या नाताळचा सण सुरु असल्यामुळे मनिष तिवारी यांनी या सणाची उपमा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

COMMENTS