मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी टाकणा-या हर्षलचा अखेर मृत्यू !

मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी टाकणा-या हर्षलचा अखेर मृत्यू !

मुंबई – मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी टाकणा-या हर्षल रावतेचा  अखेर मृत्यू झाला आहे. पाचव्या मजल्यावरुन उडी टाकल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु उपचारादरम्यान त्याचा अखेर मृत्यू झाला आहे.

कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. हर्षल  सुरेश रवाते हा 44 वर्षीय व्यक्ती मुळचा औरंगाबादमधील पैठण येथील रहिवासी आहे.

 

दरम्धयान धर्मा पाटील या शेतक-याच्या आत्महत्येनंतर आज एका तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे  राज्यभरात खळबळ माजली आहे. विरोधकांकडून याबाबत जोरदार टीका केली जात आहे. आता या आत्महत्यांच्या प्रकरणांवर आळा घालण्याचं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारपुढे आहे.

COMMENTS