सोनिया गांधी म्हणतात राहुल गांधी माझेही बॉस !

सोनिया गांधी म्हणतात राहुल गांधी माझेही बॉस !

नवी दिल्ली –  माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राहुल गांधी हे माझेही बॉस असल्याचं वक्तव्य केलं आहे. दिल्लीमध्ये गुरुवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत सोनिया गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच राहुल हे आता काँग्रेमध्ये असणा-या प्रत्येकाचेच बॉस असल्याचंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांच्या हातात सर्व सुत्रे सोनिया गांधी यांनी सोपवली असून आज झालेल्या बैठकीत त्यांनी ते माझेही बॉस आहेत असं म्हटलं आहे. यावरुन सोनिया गांधी यांनी सर्व अफवा आणि शंका कुशंकांना पूर्णविराम दिला असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS