मनोहर पर्रिकरांनी सादर केला अर्थसंकल्प, मानले सर्वांचे आभार !

मनोहर पर्रिकरांनी सादर केला अर्थसंकल्प, मानले सर्वांचे आभार !

गोवा – मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी विधानसभेत आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी एक निवेदन जारी करत सर्वांचे आभार मानले. मनोहर पर्रीकरांवर मागील आठ दिवसापासून मुंबईतील लिलावती रूग्णालयात पोटदुखीच्या त्रास झाल्याने दाखल झाले होते. मात्र, त्यांना स्वादुपिंडाचा आजार असल्याचे समोर आले. त्यामुळे गेली आठ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना गुरुवारी रुग्णालयात डिस्चार्ज दिला.

दरम्यान, रविवारी मुंबई दौ-यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लिलावतीत जाऊन पर्रीकरांच्या तब्बेतीची विचारपूस केली होती. सध्या पर्रीकरांची प्रकृती ठीक असून लिलावतीतून त्यांना तात्पुरता डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर डिस्चार्ज मिळताच गोवा विधानसभेत जाऊन राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.

COMMENTS