मुंबई – मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पूजेसाठी येऊ देणार नाही अशा प्रकराचा इशारा दिला होता. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण पंढरपूरला महापुजेसाठी जाणार नाही असं स्पष्ट केलंय. मला झेड प्लस सुरक्षा आहे. त्यामुळे मला कोणी हात लावू शकणार नाही. मात्र वारक-यांच्या सुरक्षेसाठी आपण पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला आहे असंही मुख्य्मंत्री म्हणाले. मुंबईत पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आपण घरीच विठ्ठलाची पूजा करु असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
वारक-यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका त्यांनी मराठा संघटनांवर केली. गेली 800 वर्षांची शांततेची पंरपरा आहे. त्याला बाधा पोहचू नये यासाठी आपण माघार घेत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गेली अनेक वर्ष आषाढी एकादशीला महापूजेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जातात. त्याला अडथळा निर्माण करणे चुकीचे आहे. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही लज्जास्पद बाब आहे असंही फडणवीस म्हणाले. आरक्षण न दिल्यामुळे मराठा समाजातील नाराजी वाढत आहे. मुख्यमंत्री पंढरपूरला आले तर गनिमी काव्याने त्यांना उत्तर देऊ असा इशारा देण्यात आला होता.
COMMENTS