शामसुंदर सोन्नर यांचे पत्रकार संघात कीर्तन, मा. राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील राहणार उपस्थित !

शामसुंदर सोन्नर यांचे पत्रकार संघात कीर्तन, मा. राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील राहणार उपस्थित !

मुंबई – आषाढी एकादशीनिमित्ताने मुंबई मराठी पत्रकार संघ आणि मनिषा प्रकाशनच्यावतीने महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, संवेदनशील कवी आणि पत्रकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात, सोमवार, 23 जूलै रोजी सायंकाळी 5.00 वाजता कीर्तनाला सुरुवात होणार आहे.

दरम्यान या कीर्तन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे असतील तर  माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याची संकल्पना मनिषा प्रकाशनचे प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची आहे. कीर्तन परंपरेला वेगळे आयाम देणाऱ्या शामसुंदर महाराज यांच्या ‘उजळावाया आलो वाटा’ या कीर्तन मालिकेचे मुंबईतील प्रकाशन यावेळी डी. वाय. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला पत्रकार आणि भाविकांनी मोठ्या संख्येने हजर रहावे, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण  यांनी केले आहे.

COMMENTS