मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चानं केली आहे. यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजप सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. ‘मराठा सामाजाची फसवणूक झाली असून अजूनही आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, मेगाभरतीत लाभ मिळणार नाही असे निवेदन सरकारकडून न्यायालयात सादर करण्यात आले आहे.मराठा समाजाचा लाभ कुणालाही घेता येत नाही, आधीच्या सरकारनेही फसवणूक केली, हे सरकारपण तेच करत असल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मुख्यमंञ्यांनी आश्वासन दिले पण प्रत्यक्षात काहीच नाही. अनेक वेळा आश्वासन देऊनही मागण्या प्रलंबीतच आहेत.सार्थी योजनेचे मुख्यमंत्र्यांकडून पुण्यात उद्घाटन पण प्रत्यक्षात तिथे काहीच काम सुरु झालेले नाही. कोपर्डी प्रकरणात अद्याप फाशी नाही. शिवस्मारकाचे काम प्रलंबित, असून सरकार न्यायालयात बाजू मांडू शकत नाही.
तसेच आंदोलनात दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सरकारकडून मराठा समाजातील मुलांवर दाखल झालेला एकही गुन्हा मागे नाही. याचे लेखी आश्वासन देऊनही गुन्हे मागे घेतले नाहीत. 17 फेब्रुवारीला बैठक घेतली. आचार संहितेआधी मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर लोकसभेला कमळावर बहिष्कार टाकण्याची मराठा क्रांती मोर्चाची भूमिका घेतली आहे.
तसेच 58 मोर्चे होऊनही सरकार न्याय देत नाही मग कमळावर बहिष्कार घालायचा पंढरपुरात आम्ही निर्णय घेतलाय. आगामी निवडणुकीत कमळावर बहिष्कार तर घालूच पण जिथे जमेल तिथे भाजपच्या विरोधात आम्ही उमेदवार उभे करू. युती विरोधातही निवडून येणारे आमचे उमेदवार उभे करू.5 जागांवरही आमची चाचपणी झाली असल्याचंही मराठा क्रांती मोर्चानं म्हटलं आहे.
COMMENTS