विधान भवनाबाहेर काळे झेंडे दाखवून निषेध, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

विधान भवनाबाहेर काळे झेंडे दाखवून निषेध, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

मुंबई – विधान भवनाबाहेर काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध करणा-या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरुन संवाद यात्रा मुंबईत पोहोचली दाखल झाली आहे. यावेळी विधान भवनाबाहेर काळे झेंडे दाखवून आंदोलकांनी सरकारचा निषेध केला आहे. यावेळी चार आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला सादर झाला म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळाले, असा गैरसमज झाल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाने केला होता.

दरम्यान समाज प्रबोधन करण्यासाठी संवाद यात्रा काढण्याची घोषणा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली होती. ही यात्रा आज विधान भवनावर धडकली असून मुंबईकडे येणा-या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे विधान भवनावर काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध करणाऱ्या चार आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे राज्य सरकारचा तीव्र निषेध या आंदोलकांनी केला आहे.

COMMENTS