मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक संपली, ‘असा’ झाला निर्णय !

मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक संपली, ‘असा’ झाला निर्णय !

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत विधीमंडळामध्ये घेण्या आलेली सर्वपक्षीय बैठक संपली असून सुमारे सव्वा दोन तासानंतर ही बैठक संपली आहे. या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले गंभीर स्वरूपातील गुन्हे वगळता बाकीचे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णयही या बैठकीदरम्यान घेण्यात आला आहे.

आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र यांच्यासह राज्यातील सर्व पक्षातील नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीला अनिल परब, राज पुरोहित, चंद्रकांत पाटील, कपिल पाटील, एकनाथ शिंदे, हरिभाऊ बागडे, रामदास कदम,  अजित पवार, सभापती रामराजे निंबाळकर उपस्थित, छगन भुजबळ,सुभाष देसाई, शेकाप नेते जयंत पाटील, शरद रणपिसे, सुधीर मुंगनटीवार, विनोद तावडे हे नेते उपस्थित होते.

COMMENTS