मराठा तरुण सुभाष देशमुखांना म्हणाले आमचं बारावं घालायला आलात का ?

मराठा तरुण सुभाष देशमुखांना म्हणाले आमचं बारावं घालायला आलात का ?

मुंबई – आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील मराठा तरुणांचं आजाद मैदानावर उपोषण सुरु आहे. या उपोषणादरम्यान काल सहकारमंत्री सुभाष देशुमख यांनी आंदोलक तरुणांची भेट घेतली.परंतु यावेळी देशमुख यांना उपोषणकर्त्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. ‘आमचं बारावं घालायला आलात का?’ असा सवाल या  उपोषणकर्त्यांनी देशमुख यांना केला. यावेळी विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. त्यामुळे देशमुखांचा चेहरा चांगलाच उतरला असल्याचं पहावयास मिळालं..

दरम्यान गेली १3 दिवसांपासून मराठा तरुणांचं आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणस्थळी भाजप सरकारमधील कोणताही मंत्री फिरकला नव्हता. काल मात्र सुभाष देशमुख यांनी या तरुणांची भेट घेतली.  परंतु त्यावेळी या संतप्त तरुणांनी आमचं बारावं घालायला आलात का असा सवाल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना केला.

 

 

COMMENTS