उस्मानाबाद – बड्या नेत्याच्या गाडीने मुलाला उडविले, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न ?

उस्मानाबाद – बड्या नेत्याच्या गाडीने मुलाला उडविले, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न ?

उस्मानाबाद – जिल्ह्यातील एका बड्या नेत्याच्या गाडीने एका मुलाला उडविले आहे. उमरगा शहरात हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या मुलाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघाताची कोठेच नोंद नाही हे विशेष. तक्रार नसल्याचे सांगत पोलिसांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे पत्रकारांचे फोन येतील म्हणून पोलिसांचे स्वतःचे फोन काल बंद ठेवल्याची चर्चा आहे. डोळ्यावर कायम धुंदी चढलेला हा नेता कोण. तो स्वतः गाडी चालवत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान भीतीने अपघातातील कुटुंबीय याबाबत बोलत नाहीत. मिटवामिटविचा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. पोलीस अनेक गुन्ह्यात मोठ्या शिताफीने तपास करतात, आता यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे धाडस पोलीस दाखवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धुंदीत मोटार चालविणारा हा नेता कोण, तक्रार नाही म्हणून गुन्हा दाखल ना करणे किती संयुक्तिक, याची उत्सुकता लागली आहे.

कर्तव्यदक्ष म्हणून ख्याती असलेले पोलीस आधीक्षक यामध्ये लक्ष देऊन गुन्हा दाखल होईल का, याची सामान्य जनता वाट पाहत आहे. विशेष म्हणजे या पूर्वीही असेच अपघात झाले होते. ते पचविण्यात या नेत्याला यश आले आहे. जिल्ह्यात या अपघाताची चर्चा असून नेहमीप्रमाणे हा अपघात लपवला जाणार का? असा सवाल केला जात आहे.

COMMENTS