मूक मोर्चा नाही यापुढे गनिमी कावा, तुळजापुरच्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय !

मूक मोर्चा नाही यापुढे गनिमी कावा, तुळजापुरच्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय !

उस्मानाबाद – मूक मोर्चा नाही तर आता गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा पवित्रा मराठा क्रांती मोर्चाच्या बुधवारी (ता. 20) तुळजापूरमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याची सुरूवात 29 जून रोजी तुळजापूरमध्ये जागरण गोंधळ घालून करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. राज्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या मंगल कार्यालयात बुधवारी घेण्यात आली. यावेळी क्रांती मोर्चाच्या विविध समन्वयकांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली.

राज्यात मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे काढले. त्यानंतर शासनाने विविध घोषणा केल्या. यातील एकही घोषणा खरी ठरलेली नाही. विद्यार्थ्यांची आर्धी फीसमाफ करणे. जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह बांधणे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आर्थिक मदत करणे आदी बाबींची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. या सर्व घोषणा फसव्या निघाल्या आहेत. तसेच आरक्षणाच्या मुख्य मागणीकडेही दुर्लक्ष झाले आहे. मुक मोर्चाने सरकारला जाग येत नाही. यापुढे शासनाला गनिमी काव्याने धडा शिकविण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला.

तुळजापूरनंतर राज्यात सर्वत्र गनिमी काव्याने मोर्चे काढले जाणार आहेत.  मोर्चानंतर मुख्यमंत्र्यासोबत फितूर झालेल्यांचा इतिहास माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी एकही क्रांती मोर्चचा प्रतिनिधी जाणार नाही. त्याला मोर्चातून तसेच समाजातून बहिष्कृत करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः मोर्चासमोर येऊन भूमिका मांडू शकतात.  तुळजापूरमध्ये झालेल्या बैठकीत सर्वच समन्वयकांनी आक्रमक भूमिका मांडल्याने पुढील काळात मराठा समाजाकडून राज्यात आंदोलने
होण्याचे संकेत मिळत आहेत.

COMMENTS