मेघालयात काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळूनही ‘एनडीए’चाच मुख्यमंत्री !

मेघालयात काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळूनही ‘एनडीए’चाच मुख्यमंत्री !

नवी दिल्ली   मेघालय विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळवून काँग्रेस पक्ष मोठा ठरला आहे. परंतु 60 पैकी 21 जागा मिळूनही सत्तेपासून काँग्रेसला दूर रहावं लागणार आहे. कारण भाजप समर्थित सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एनपीपी, स्थानिक पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने मेघालयमध्ये एनडीएचं सरकार स्थापन केलं जाणार आहे. याबाबात एनडीएच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. या निवडणुकीत काँग्रेनंतर एनपीपीने सर्वातं जास्त जागा मिळवल्या होत्या. त्यामुळे एनपीपी नेते कोनराड संगमा हे 6 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

मेघालयात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ?

भाजप – 2

काँग्रेस – 21

यूडीपी – 6

एनपीपी – 19

अन्य – 11

दरम्यान मेघालयमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 30 ही मॅजिक फिगर आहे. त्यानुसार एनपीपी -19, भाजप-2, यूडीपी-6, एचएसपीडीपी-2, पीडीएफ-4 आणि एका अपक्ष उमेदवाराने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एनडीएची एकूण सदस्यसंख्या 34 झाली आहे.

COMMENTS