मंत्रीच वेलमध्ये उतरले , विधानपरिषदमध्ये अभूतपूर्व गोंधळ  !

मंत्रीच वेलमध्ये उतरले , विधानपरिषदमध्ये अभूतपूर्व गोंधळ !

नागपूर – विधानपरिषदमध्ये आज अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला आहे. कामकाजादरम्यान मंत्रीच स्वतः वेलमध्ये उतरले असल्याचं पहावयास मिळालं आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षातील अमरसिंह पंडित यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे उपस्थित केला. मराठवाड्यात वैद्यकीय प्रवेशात सर्वाधिक कमी जागा असल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधारी यांना धारेवर धरले. या मुद्दयावरुन गिरीश महाजन वेलमध्ये उतरले होते.

दरम्यान मराठवाडामध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील कोटा हा 1985 पासून असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. मात्र यावर संतापलेल्या विरोधकांनी गोंधळ घातला आणि या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री यांनी द्यावे अशी मागणी केली. तेव्हा सत्ताधारी यांनी आक्षेप घेतला. मात्र यावर गोंधळ होत सत्ताधारी आमदारही वेलमध्ये उतरले. तेव्हा चक्क वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनही वेलमध्ये उतरल्याचे चित्र बघायला मिळाले. यावर आक्षेप घेत विरोधकही वेल मध्ये उतरले. या गोंधळामुळे विधानपरिषद कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.

COMMENTS