बंगळुरु – आपल्या लाडक्या मंत्र्यासोबत सेल्फी काढणं एका कार्यकर्त्याला खूपच महागात पडलं आहे. ही घटना कर्नाटकमधली असून प्रचारादारम्यान ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासोबत सेल्फी काढायला आलेल्या कार्यकर्त्याला सेल्फीऐवजी चक्क धडाका मिळाला आहे. राज्यात सध्या निडढणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षाचे नेते प्रचारामध्ये गुंतले आहेत. निवडणुकीचं वातावरण असल्यामुळे एक एक कार्यकर्त्याला हताशी धरुन सर्वच पक्षातील नेते कामाला लागले आहेत. आपला कार्यकर्ता नाराज होणार नाही याची खबरदारी या काळात जास्तप्रमाणात घेतली जाते. परंतु डी. के. शिवकुमार हे याला अपवाद ठरले असल्याचं दिसलं असून त्यांनी कार्यकर्त्याला जवळ करण्यासापेक्षा सेल्फी काढणा-याला कार्यकर्त्याच्या मोबाईलवर चक्क धडाका लावला आहे.
#WATCH Karnataka Minister DK Shivkumar slaps away phone of a man who was trying taking a selfie with him in Bellary (4.2.18) pic.twitter.com/iLo6OSyT2Z
— ANI (@ANI) February 5, 2018
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच एएनआयनं देखील हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये मंत्री गर्दीमध्ये दिसत आहेत. त्याच वेळी एक कार्यकर्ता खिशातून फोन काढून सेल्फी घेऊ लागला. त्याचवेळी डी. के शिवकुमार यांनी त्याच्या हातावर धडाका लगावला आणि या कार्यकर्त्याचा मोबाईल खाली पडला. शिवकुमार यांच्या या वर्तनामुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या नाराजीचा सूर दिसून येत आहे.
COMMENTS