लैंगिक छळाच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांचा राजीनामा !

लैंगिक छळाच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांचा राजीनामा !

नवी दिल्ली – लैंगिक छळाच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. तब्बल २० महिलांनी त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. परंतु माझ्यावरील सर्व आरोप खोटे असून या आरोपांविरोधात मी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी आता परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून मला देशसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांचा आभारी असल्याचं  अकबर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान याबाबत काँग्रेसनं एम जे अकबर यांच्यासह भाजप सरकारवर जोरदार टीका केली होती. मोदी सरकारनं लैंगिक छळ करणाऱ्या अतिरेक्यांना पाठिशी का घालावं असा सवाल करत काँग्रेससह विरोधकांनी भाजपाची कोंडी केली. त्यामुळे अखेर एम जे अकबर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

एम. जे. अकबर पत्रकारितेत असताना त्यांनी नवोदित महिला पत्रकारांची लैंगिक छळवणूक केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. प्रिया रमाणी या पत्रकारानं धाडस दाखवत एशियन एजचे संपादक असताना अकबर यांनी केलेल्या छळाचा पाढा ट्विटरवर वाचला आणि अनेक महिलांनी पुढे येत अकबर यांच्यावर निशाणा साधला. रमाणी यांच्या मागे तब्बल १९ महिला उभ्या राहिल्या आणि त्यांनी अकबर यांना जशास तसं उत्तर देण्याचा निर्धार केला आहे.

 

 

COMMENTS