ब्रेकिंग न्यूज – आमदार बच्चू कडूंना एका वर्षाची शिक्षा !

ब्रेकिंग न्यूज – आमदार बच्चू कडूंना एका वर्षाची शिक्षा !

अमरावती : वाहतूक पोलिसाला मारहाण करणं अपक्ष आमदार बच्चू कडू यांना महागात पडलं असून त्यांना  एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अचलपूर कोर्टानं ही शिक्षा सुनावली असून याबरोबरच त्यांना 600 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मागच्या वर्षी चांदूर बाजारमध्ये वाहतूक पोलिस इंद्रजित चौधरी यांना आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणात बुधवारी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दरम्यान गेल्या वर्षी 24 मार्च रोजी आमदार बच्चू कडू यांनी परतवाडा एस टी डेपो चौकातील खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई का करत नाहीत असा जाब विचारत आमदार कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अश्लिल शिवीगाळ करुन वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा आरोप होता. त्यामुळे ही मारहाण त्यांना महागात पडली आहे.

COMMENTS