देशाची राजधानी दिल्लीत सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे अनेकजण तोंडाला मास्क लावून बाहेर पडताना दिसत आहेत. पण आता काहींनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला मास्क लावला आहे. आम आदमी पक्षाचे निलंबित आमदार कपिल मिश्रा आणि भाजपचे आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी चक्क महात्मा गांधींच्या पुतळ्याला मास्क लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
शहरातील 11 मूर्तीवरील असलेल्या मूर्तींना मास्क लावल्यामुळे या दोन्ही नेत्यांना चाणक्यपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कपिल मिश्रा आणि मनजिंदर सिंग सिरसा यांनी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात आप सरकारला अपयश आल्याचा आरोप करत 11 मूर्ती येथे निर्दशने केले आणि गांधीजी व इतर मूर्तींना मास्क लावला.
बिफोर केजरीवाल आणि अफ्टर केजरीवाल अशा आशयाचं ट्विट करत गांधींचा मास्क न घातलेला आणि मास्क घातलेला असे दोन फोटो कपिल मिश्रा यांनी ट्विटरवही पोस्ट केलेत.
COMMENTS