मनसेच्या आजच्या बैठकीत ठरला 2019 च्या विधानसभेसाठी ‘हा’ ऍक्शन प्लॅन !

मनसेच्या आजच्या बैठकीत ठरला 2019 च्या विधानसभेसाठी ‘हा’ ऍक्शन प्लॅन !

मुंबई – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना  कामाला लागली असल्याचं दिसून येत आहे. या निवणुकीसाठी मनसेकडून निकराचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी आतापासूनच मनसेनं ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनसोबतच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्याचा दौरा करणार आहेत. या दौ-यात ते प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे दौ-यावर जाणार असल्याचं मनसेच्या सूत्रांनी सांगितलं आहे. याबाबत दादरमधील रविंद्र नाट्यमंदिरात राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यव्यापी दौऱ्याच्या अनुषंगानं पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

असा आहे ऍक्शन प्लॅन

राज ठाकरे यांच्या दौऱ्याआधी पक्षाचे निरीक्षक 288 विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. ते राज्यातील या प्रत्येक मतदारसंघात जाऊन पक्षाच्या स्थितीची माहिती घेणार आहेत. निरीक्षकांकडून आलेल्या अहवालानुसार मनसेसाठी पोषक वातावरण असलेल्या मतदारसंघावर पक्षाकडून लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. तसेच निवडणुकीत सुमारे 150 ते 170 मतदारसंघात पूर्ण तयारी आणि ताकदीनिशी उतरण्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी केली जात असल्याचं दिसून येत आहे.

 

 

COMMENTS