जालना – राज्यात काँग्रेसच्या फेवरमध्ये वातावरण झालं असून, लोक तसं थेट बोलू लागले आहेत. मात्र राष्ट्रवादीवर अद्याप लोकांचा विश्वास बसत नाही, त्यामुळे काँग्रेससाठी वातावरण अनुकूल असल्याचं वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. बाळा नांदगावकर यांनी आज जालना जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरम्यान भाजपची स्थिती अवघडल्यासारखी झाली असून ती कॉम्प्रमाईजच्या भूमिकेवर आले आहेत. स्वबळाची भाषा करणारे स्वबळावर लढणार नाहीत असं भाकीतही त्यांनी नाव न घेता शिवसेनेबाबत केलं आहे. सध्याचं वातावरण काँग्रेसच्या फेवरमध्ये असल्याचं वक्तव्य मनसेच्या नेत्यानं केलं असल्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चेला उधाण आलं असून विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.
COMMENTS