मनसेच्या गटनेतेपदी संजय तुर्डे यांची वर्णी लागण्याची शक्यता

मनसेच्या गटनेतेपदी संजय तुर्डे यांची वर्णी लागण्याची शक्यता

मुंबई – नगरसेवक संजय तुर्डे यांना मनसेचं गटनेतेपद द्या, अशी मागणी करणारं पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला धाडलं आहे. मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेकडे संजय तुर्डे हे  एकमेव नगरसेवक राहिले आहेत. कोकण भवन आयुक्तांनी मनसे आणि शिवसेनेच्या याचिका दाखल करुन घेतल्यानंतर मनसेचा जुना गट हा सध्या तरी कायम आहे. मात्र मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दिलीप लांडे यांच्या नावावरचे गटनेतेपद संजय तुर्डे यांना देण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

महापालिका सभागृहात महापौर नव्या गटनेत्यांचे नाव जाहीर करणार असून आता नोव्हेंबरमध्ये सभागृह भरेल. त्यावेळी मनसेचं गटनेतेपद संजय तुर्डेंकडे दिलं जाण्याची शक्यता आहे. मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या 6 नगरसेवकांना कोकण आयुक्तांनी नोटीस बजावली असून शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल आपलं लेखी म्हणणं मांडा, असं या नोटिशीत म्हटलं आहे. आता हे सहा नगरसेवक सोमवारी आपलं स्पष्टीकरण कोकण आयुक्तांकडे देण्याची शक्यता आहे.

COMMENTS