मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला

मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला

मुंबई – मालाड पश्चिम येथे फेरीवाल्यांनी मनसे विभागअध्यक्ष सुशांत माळवदे यांना मारहाण केलीय. गेले काही दिवसापासून मुंबईमध्ये मनसेकडून फेरीवाले हटाव मोहीम राबवली जात आहे यातून हा संघर्ष उफाळला आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मनसेच्या फेरीवाला हटाव मोहिमेचा जोरदार विरोध केला होता. निरुपम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात फेरीवाल्यांसमोर चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. संजय निरुपम यांचा निषेध करण्यासाठी सकाळी सुशांत माळवदे आपल्या कार्यकर्त्यांसह मालाड पश्चिम रेल्वे स्टेशनच्या बाहेर आले होते. पोलिसांनीही प्रसंगावधान राखून यावेळी माळवदे यांना ताब्यात घेतले होते. मात्र माळवदे यांना सोडून देण्यात आल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा फेरीवाला हटाव मोहीम सुरु केली. यावेळी झालेल्या संघर्षात माळवदे यांना मारहाण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. माळवदे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

‘फेरीवाल्यांविरोधातील कारवाई ही पालिका प्रशासन, फडणवीस सरकार आणि मनसे यांची मिलीभगत आहे. माझे पोलिसांना सुद्धा सांगणे आहे की, या गरीब फेरीवाल्यांना जर कोणी मनसेचे फालतू गुंड त्रास देत असतील, दादागिरी करत असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करा.’ असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले होते.

 

COMMENTS