मुंबई – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये एकमेकांचे पदाधिकारी-कार्यकर्ते फोडाफोडीला सुरुवात झाली असल्याचं दिसत आहे. मनसेच्या विभाग अध्यक्षांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे भायखळा विभाग अध्यक्ष विजय लिपारे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मातोश्री’त प्रवेश करण्यात आला.
दरम्यान विजय लिपारे पूर्वीपासून मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे निकटवर्तीय म्हणून पक्षात परिचित आहेत. तसेच भायखळ्यात लिपारे यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांनीच पक्षाला सोडचिठ्ठी दिली असल्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला मोठा धक्का मानला जात आहे तर भायखळ्यात लिपारे यांच्या माध्यमातून शिवसेनेची ताकद वाढली असल्याचं दिसत आहे.
COMMENTS