पंकजा मुंडेंनी रूग्णालयात जावून घेतली बंजारा समाजाचे गुरु रामराव महाराजांची भेट !

पंकजा मुंडेंनी रूग्णालयात जावून घेतली बंजारा समाजाचे गुरु रामराव महाराजांची भेट !

मुंबई – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज लिलावती रूग्णालयात जावून महान तपस्वी रामराव महाराज यांची भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. बंजारा समाजाचे गुरू पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे महान तपस्वी रामराव महाराज सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे लिलावती रूग्णालयात उपचार घेत आहेत. पंकजा मुंडे यांनी आज लिलावती रूग्णालयात जावून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांकडून त्यांनी तब्यतेची माहिती घेतली.

‘प्रकृतीची काळजी घ्या, तुम्ही लवकर बरे व्हाल’ असे त्या यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या. तब्येत बरी नसतांना देखील रामराव महाराजांनी यावेळी सावरगांव घाट येथे झालेल्या मेळाव्याची आठवण पंकजाताई मुंडे यांच्याशी बोलतांना काढली.

COMMENTS