मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट, नोकर भरतीसंदर्भात सकारात्मक चर्चा  !

मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट, नोकर भरतीसंदर्भात सकारात्मक चर्चा !

नवी दिल्ली – रेल्वेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी संपूर्ण भारतातून हजारोच्या संख्येने आलेले रेल्वेचे प्रशिणार्थिंनी काल मुंबईत दादर ते माटुंगा दरम्यान आंदोलन केले होते. त्यावेळी रेल्वे प्रशासनामार्फत अमानुषपणे लाठीमार करण्यात आला होता. त्याच दरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी नोकर भरतीच्या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांना आश्वासन देऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे नेत्यांच्या शिष्टमंडळास रेल्वे मंत्र्यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानंतर रेल्वे ॲक्ट ॲप्रेंटिसच्या विविध मागण्यांसाठी प्रशिक्षणार्थिंसह  मनसे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, सरचिटणीस मनोज चव्हाण, संदिप देशपांडे, मनसे रेल्वे सेनेचे सरचिटणीस जितु पाटील यांच्या शिष्टमंडळानं आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आहे.

दरम्यान रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मनसेच्या शिष्टमंडळामध्ये  रेल्वेचे प्रशिणार्थीनी विद्यार्थ्यांच्या नोकरभरतीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून आता नव्याने होणाऱ्या नोकर भरतीत रेल्वे बोर्ड प्रणालीने ठरविलेल्या २० टक्के राखीव कोट्याअंतर्गत रेल्वेमध्ये अप्रेंटिस केलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनाच सामावून घेतले जाईल असे आश्वासन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मनसेच्या शिष्टमंडळास दिले आहे. तसेच  रेल्वे अप्रेंटिस विद्यार्थ्यांच्या नोकरी नियुक्तीबाबत सप्टेंबर २०१७ च्या निर्णयाला अधीन राहून या प्रशिक्षणार्थीच्या निवडीबाबत सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याचे आश्वासन देखील रेल मंत्र्यांनी यावेळी दिले आहे.

COMMENTS