अजित पवार, राज ठाकरे भेटीनंतर आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसेचा मोठा निर्णय !

अजित पवार, राज ठाकरे भेटीनंतर आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसेचा मोठा निर्णय !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसेनं मोठा निर्णय घतेला असून लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं मनसेनं जाहीर केलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडीला पूर्णपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून  विधानसभा निवडणूक आघाडीसोबत लढण्याचा निर्णय मनसेनं घेतला असल्याची माहिती आहे.

दरम्यान आज दुपारी राज ठाकरे आणि अजित पवार यांची दादर इथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर मनसेनं लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत आघाडीमधून मनसेला मुंबईतील शिवडी,भायखळा आणि माहीम मतदारसंघ देण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS