राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, लोकसभेच्या काही जागा मनसेला देणार?

राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, लोकसभेच्या काही जागा मनसेला देणार?

मुंबई –  राष्ट्रवादी काँग्रस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली.
शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक या ठिकाणी ही भेट झाली. या दोन्ही नेत्यांच्या.भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

पुत्र अमित यांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटण्यात सध्या राज ठाकरे व्यस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ही भेट घेतली आहे. ही भेट अमितच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर असली तरी त्यात राजकीय चर्चा झाली असल्याची माहिती आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ मनसेने लढवण्यासाठी राज इच्छुक आहेत. यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्या वाट्याच्या जागा मनसेला दिल्या जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS