मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंचं व्यंगचित्र !

मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंचं व्यंगचित्र !

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आणखी एक व्यंगचित्र काढलं असून यामध्ये त्यांनी ‘मराठी भाषा दिना’ निमित्तानं मनात काय विचार आले, हे व्यंगचित्रात रेखाटलं आहे. या व्यंगचित्रासोबत त्यांनी आपले विचारही मांडले आहेत. ‘कालच मराठी राजभाषा दिन झाला, त्यानिमित्त मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि देशातल्या इतर भाषिक आणि प्रांतिक अस्मिता याच्यावर एक व्यंगचित्र सुचलं होतं. काल ते पूर्ण होऊ शकलं नाही, पण आज ते इथे प्रसिद्ध करतोय. नक्की पहा आणि विचार करा. मराठी अस्मिता ही जातींच्या पलीकडे जायला हवी हीच इच्छा…’ असंही राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुकवर म्हटलं आहे.

COMMENTS