कल्याण – आगामी काळात भाजप आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा सुरु असतानाच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु ही भेट राजकीय नसल्याचं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. माहिती कल्याण डोंबिवलीतील नागरिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका बनवण्याची मागणी राजू पाटील यांनी केली.27 गावांसाठी आगामी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करण्यात यावी, अशीही इच्छा राजू पाटलांनी बोलून दाखवली.
उपमुख्यमंत्री मा.श्री.अजित पवार साहेब यांची आज भेट घेतली.
विषय-
१) २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी.
२) कल्याण ग्रामीण मतदारसंघातील येणाऱ्या दिवा शीळ डायघर विभागात टोरंट कंपनीला स्थगिती देण्यात यावी.
३) २७ गावांकरीता येत्या अर्थसंकल्पात विशेष निधी ची तरतूद करण्यात यावी. pic.twitter.com/cGfcUBGvFh— Raju Patil (@rajupatilmanase) January 29, 2020
दरम्यान राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार विधानसभेवर निवडून आले आहेत. राजू पाटील हे कल्याण ग्रामीण मतदारसंघातील आमदार आहेत. मनसेची खिंड लढवण्याची जबाबदारी राजू पाटलांवर आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीण मतदारसंघातील विकासावर त्यांनी भर दिला असल्याचं दिसत आहे.
COMMENTS