आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय !

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय !

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मतदारांमधून थेट सरपंच निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडणूक होणार आहे. भाजपा सरकारने थेट लोकांमधून सरपंच निवडीचा घेतला होता निर्णय
परंतु भाजपाचा हा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. तसेच आणखी काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत…

1) अध्यापकांसाठी प्रशिक्षण संस्था स्थापण्याचा निर्णय

2) तंत्रश‍िक्षण संचालनालयाच्या संस्थांमधील श‍िक्षकीय, समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग

3) पीएचडीधारक अध्यापकांना 1996 पासून दोन वेतनवाढी

4) सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधून करण्याचा निर्णय

5) तसेच सारथी संस्थेतील अनियमिततेची चौकशी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

COMMENTS