शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा !

शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा !

मुंबई – शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये आज तुफान राडा झाला आहे. लोअर परेलमध्ये असलेल्या उड्डाणपुलावर हा राडा झाला असून पाहणी दौ-यात मनसे कार्यकर्त्यांनी घुसखोरी केली असल्याचा दावा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे याठिकाणी जमलेल्या मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना शांत केलं आहे.

दरम्यान वरळी येथील शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे आणि मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी हे लोअर परेल येथील उड्डाण पुलाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अरुंद वाट असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. अशातच दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत एकमेकांना शिवीगाळही केली असल्याची माहिती आहे. यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमधील वाद वाढत असल्याचं पाहून पोलिसांनी तत्काळ मध्यस्थी करत दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना शांत केले. मनसे आणि शिवसेना कार्यकरत्यांच्या या राड्यामुळे लोअर परेलमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे.

COMMENTS