मनसेत लवकरच अंतर्गत बदल होणार; सूत्रांची माहिती

मनसेत लवकरच अंतर्गत बदल होणार; सूत्रांची माहिती

कल्याण –  कल्याण-डोंबिवली शहरातल्या पक्षसंघटनेत लवकरच अंतर्गत बदल करण्यात येणार असल्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेत. डोंबिवलीत पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या गोपनीय बैठकीत त्यांनी याबाबत सूतोवाच केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या डोंबिवली आणि कल्याण दौऱ्यावर आले आहेत. सकाळी त्यांनी शाखाअध्यक्ष आणि त्याखालच्या पदाधिका-यांशी चारकंग करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी अकार्यक्षम पदाधिका-यांबाबत तक्रारी केल्या. त्यामुळं लवकरच संघटनेत अंतर्गत बदल करण्यात येतील, तसंच काम करणा-यांना संधी देऊन अकार्यक्षम लोकांना नारळ देणार असल्याचं सूतोवाच राज ठाकरेंनी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. त्यामुळं पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी लवकरच संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त होतेय.

COMMENTS