मोदींनी गुजरातच्या प्रचारसभेत चक्क महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचं केलं  तोंडभरुन कौतुक !

मोदींनी गुजरातच्या प्रचारसभेत चक्क महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचं केलं तोंडभरुन कौतुक !

 गुजरात – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे नेते शहजाद पुनावाला यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. काँग्रेसमधील घराणेशाहीविरोधात आवाज उठवून पुनावाला यांनी बहादुरीचं काम केलं आहे. काँग्रेसमध्ये ही दुखःची बाब असून आजपर्यंत हेच चालत आलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते गुजरातमधील प्रचारसभेत बोलत होते.

     राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. परंतु राहुल गांधी यांच्या निवडीला काँग्रेस नेते शहजाद पुनावाला यांनी विरोध दर्शवला आहे. हा काँग्रेसच्या इतिहासातील काळा दिवस असल्याची टीका त्यांनी केली आहे.त्यांच्या टीकेनंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचं कौतुक केलं आहे.

पंतप्रधान मोदींनी केलेल्या कौतुकानंतर पुनावाला यांनी मोदींचे आभार मानलेत. धन्यवाद म्हणत त्यांनी मी काँग्रेसच्या घराणेशाहीविरोधात कायम लढत राहणार असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान ‘औरंगजेब राजवटीबद्दल काँग्रेसचे अभिनंदन. मात्र आमच्यासाठी लोकांचे कल्याण महत्त्वाचे आहे. १२५ कोटी जनताच आमची हायकमांड आहे,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसच्या हायकमांड संस्कृतीवर तोफ डागली. ‘काँग्रेस हा पक्ष नसून त्यामध्ये केवळ एका कुटुंबाचाच शब्द अंतिम असतो, हे काँग्रेसच्याच नेत्यांनी मान्य केले आहे’, असेही ते म्हणाले.

COMMENTS