मुंबई – विरोधकांकडून अनेकवेळा मोदी सरकारच्या जाहिरातबाजीवर टीका केली जाते. सत्तेत आल्यापासून सरकारच्या अनेक जाहिराती टीव्ही आणि वृत्तपत्रात झळकत असल्याच्या पहावयास मिळतात. याच जाहिरातबाजीवर मोदी सरकारनं केलेल्या खर्चाचा आकडा माहिती अधिकारातून समोर आला आहे. गेल्या साडेतीन वर्षांत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जाहिरातींवर तब्बल ३ हजार ७५५ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रेटर नोएडास्थित माहिती अधिकार कार्यकर्ते रामवीर तन्वर यांनी काढलेल्या माहितीनुसार एप्रिल २०१४ ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत इलेक्ट्रॉनिक आणि छापील माध्यमे आणि फलक आदी माध्यमांतील जाहिरातींसाठी सरकारने ३७,५४,०६,२३,६१६ रुपये खर्च केल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने माहिती अधिकाराअंतर्गत दिली आहे.
रेडिओ, डिजिटलसाठी १,६५६ कोटींचा खर्च
सिनेमा, दूरदर्शन, इंटरनेट, एसएमएस, टीव्ही या इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील जाहिरातीसाठी तर १,६९८ कोटी रुपये छापील जाहिरातींसाठी खर्च केले आहेत. फलक, पोस्टर्स, कॅलेंडर आदी माध्यमातील जाहिरातींसाठी ३९९ कोटी रुपये खर्च केले आहेत. मोदी सरकारनं केलेल्या या जाहिरातबाजीच्या खर्चावरुन विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.
COMMENTS